Chakradhar swami !! " सुमन " !! मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला | चरण कमल हारामाजी गुंफू दे तनूला || धृ|| जीवन माझे दो घडीचे ,सार्थक करी तू त्याचे | सुकून माती होईल त्याची ,तूझ्या पायथ्याला ||1|| प्रिती देव पूजायाला , कुणीतरी येतील बाला | चरण धुळ म्हणून मजला ,लावतील भाळा || 2 || रिंगणीची सुमने म्हणूनी, ओळगविले त्या साधेनी | भाव सुवर्णदेखूनी, स्विकारीले त्याजला || 3|| !! " दंडवत प्रणाम " !!
DANDVAT PRANAM