Chakradhar swami
!! " सुमन " !!मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला |चरण कमल हारामाजी गुंफू दे तनूला || धृ||जीवन माझे दो घडीचे ,सार्थक करी तू त्याचे |सुकून माती होईल त्याची ,तूझ्या पायथ्याला ||1||प्रिती देव पूजायाला , कुणीतरी येतील बाला |चरण धुळ म्हणून मजला ,लावतील भाळा || 2 ||रिंगणीची सुमने म्हणूनी, ओळगविले त्या साधेनी |भाव सुवर्णदेखूनी, स्विकारीले त्याजला || 3|| !! " दंडवत प्रणाम " !!
Comments
Post a Comment